कविता लिहिताना!

लिहीताना विचार करू नये लिहीत जावं
अनेक चुका होतात पण पुढे जाव

विचार करायची वाट का बघायची
येत नसेल तर कविता का करायची ?

अगदीच हट्ट असेल कशीतरी यमके जुळवायचा
तर असाच कसा तरी शब्दाला शब्द मिळवायचा

अहो सुंदर कविता का सगळ्याना जमते
आपण म्हणावं प्रत्येक कविता सुंदर असते

पण कधी कधी काहीच सुचत नाही
म्हणुन का आम्ही कविताच करायची नाही ?

अरे हट , नाही जमले तरी बेहत्तर!
कोण वाचेल हा विचार करू नंतर

चला एक प्रयत्न .........
अनुत्तरित प्रश्न तर मनात साचलेले असतात
उत्तरे मिळवताना आपले केस पिकतात!

अरे वा सुरुवात तरी बरी(च) झाली
म्हणता म्हणता माझीही कविता तयार झाली..!

Comments

Rahul Sudke said…
This comment has been removed by the author.

Popular posts from this blog

Few questions after a win in Lost series...

Lihine...sodane

RaajGad - A Trek part 1