Posts

नमन !

वाटे तुला की, तू एकटा न संगे कोणी , दिवस सरता खायला येई , सुन्न भयाण शांतता न कळे काही , त्रस्त तु सर्वथा मग, कर तू , वाच तू, स्मर तू हे नमन , आहे हे तुजकरिता! मना प्रमाणे सर्व , आनंद वसे अनंता साथ मिळे तुला , जीवन एक कविता सुंदर मोहक दिसे न कुठे कुरुपता असावी ही , पुस्तकातली परिकथा मग, स्फुरे तुला, आवडे तुला, स्मरे तुला, हे नमन , आहे हे तुजकरिता!

कालाय तस्मै नम: !

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगरी जवळच  एक आयटीपार्क नावाचं शहर होतं . शहर मोठ टूमदार .  मोठ्या मोठ्या इमारती, सुंदर चौपदरी  रस्ते. देशाच्या राजानेही या नगरीसाठी  बरयाच सोयी-सुविधा  मोफत  दिल्या होते. करआकारणी सवलतीच्या दारात केली होती. कामगार कायदे  पुरातन असल्याने या नगरीला त्यातून सुट  देण्यात आली .  ह्या नगरीचा विकास होण्यात एकंदर राजाही प्रयत्नशील होता.    एकूणच सगळं  ऐटीत  चालल होतं . शहरातले  लोक सुजाण , सुशिक्षित   आणि कामसू होते.  त्यांच कामही बौद्धिक आणि आवडीचे असे होते. रोज सकाळी शहरातली लोक आपल्या   आपल्या  संस्थेत  जात. प्रत्येक संस्थेत त्यांना चांगली  वागणूक मिळत असे. वातानुकुलीत दालने,  हवा तेंव्हा  आणि पाहिजे  तेंव्हा    चहा- कॉफी , सकाळ - संध्याकाळचा नाष्टा ,दुपारचे जेवण एकदम  वाजवी दारात असा शाही  थाट  होता. कामाचाही फार जास्त दबाव  नसे, सकाळी ९ ...

नाटेकर

नाटेकर , आम्ही सगळे त्यांना नाटेकर म्हणूनच ओळखायचो , त्यांचं नाव माहित   करायच्या भानगडीत बहुधा कोणीच कधी पडलं नाही. मी रत्नागिरीचा मूळचा, तिथे   आजुबाजूला जमीनीवर खटले हे चालुच असतात. नाटेकर ही तिथलेच . रत्नागिरी च्या बाजुलाच केळ्ये गाव आहे , तिथले सर्वात मोठे खातेदार ,म्हणजे सर्वात  जास्त सारा भरणारे, पण तो आहे केवळ कागदावरचा हक्क , प्रत्यक्षात  त्यांच्याकडे एक गुंठाही नाही. लहानपणापासून जेव्हा बघत आलोय तेव्हा  तेव्हा त्यांच्याकडे अनेक पिशव्या दिसत.नंतर कळलं , की यात सर्व  खटल्यांची कागदपत्रं आहेत. स्वत:चे खटले चालवता चालवता ते यात इतके तरबेज  झाले की ते इतरांचेही कज्जे घेऊ लागले. ते स्वतः खटले चालवतात.  पण नाटेकरांची खरी ओळख मला यामुळे नाही झाली , तसंही कोर्टकचेरीतलं  अजुनही विशेष कळत नाही , त्यावेळी तर बिलकुलचं नाही. आमचही गाव केळ्ये ,  तिथे त्रिपूरी पौर्णिमेचा ऊत्सव मोठ्या जोरात साजरा होतो , दिवाळीच्या   दरम्यान जी काकडे आरत चालू होते ती त्रिपूरीला संपते, आणि मग त्यादिवशी  गावजेवण असे. असाच पहिल्या पंक्तीला बसला असताना, ...

Lihine...sodane

Sodalele lekhan parat chalu karanyachi faar iccha hotey ... maahit naahi asa ka hota ki mi  roj lihu shakat naahi. Faar vatata lihava. bajula ghadanarya ghatananvishayee.. kahi manatalya goshtivishayee.. kadhi vel nasto , tar kadhi mood nasto. Ek na Satra karana .Mala vatatay pramukh karan mhanje mi faar atmkendri zaalo aahe  , guntloy svatamdhe . Baher ch naahi padat aahe. Ho barobar khara karan hech aahe. Karan kallay aata tar .. sodto te, ani lihito parat , roj nahi tari madhun madhun haa evadha svatala vel deto , je hajaro vichar manat yetat te lihun thevato . This is the time when I am at my most productive... rest is crap. Chala tar mag ...Gogate pudhe vaa....Sarasvati che bhakta tumhi .. Seva ghadu de..

करायचं ते करून टाक

मझ्या मनाल नाही पटत तिला नसेल ना हे रुचत सगळ्या जगाचं तुला कळतं दुस-याचं मन बरं दिसतं मग बसतो रडत कुथत किति झाले अंक मोजत, मग रडत बसण्यापेक्षा आणि अंक मोजण्यापेक्षा करायचं ते करून टाक , विचार तुझा चुलीत टाक ॥ ती फक्त छान आहे, हे काय महान आहे, रूप वगैरे झूठ आहे पुस्तकी ग्यान पाठ आहे खरं , तू एक माठ आहे न संपणारी ही वाट आहे कधी , त्या रुपाच्या धुंदीत, सुंदर , एका गाण्याच्या गुंगीत करायचं ते करून टाक , विचार तुझा चुलीत टाक ॥ दैवावर तुझा प्रचंड विश्वास स्व्प्ने असती केवळ भास अरे आव्हान दे कधी दैवास घेउन बघ एक मोठा चान्स प्रेम सजवेल मग तुझी आरास चालु होइल एक अध्याय खास अशाच कवितेने प्रेरित होउन वाटल्यास छोटा मुहुर्त पाहून करायचं ते करून टाक , विचार तुझा चुलीत टाक ॥

कविता लिहिताना!

लिहीताना विचार करू नये लिहीत जावं अनेक चुका होतात पण पुढे जाव विचार करायची वाट का बघायची येत नसेल तर कविता का करायची ? अगदीच हट्ट असेल कशीतरी यमके जुळवायचा तर असाच कसा तरी शब्दाला शब्द मिळवायचा अहो सुंदर कविता का सगळ्याना जमते आपण म्हणावं प्रत्येक कविता सुंदर असते पण कधी कधी काहीच सुचत नाही म्हणुन का आम्ही कविताच करायची नाही ? अरे हट , नाही जमले तरी बेहत्तर! कोण वाचेल हा विचार करू नंतर चला एक प्रयत्न ......... अनुत्तरित प्रश्न तर मनात साचलेले असतात उत्तरे मिळवताना आपले केस पिकतात! अरे वा सुरुवात तरी बरी(च) झाली म्हणता म्हणता माझीही कविता तयार झाली..!

RaiGad quote

I like this quote about RaiGad very much .. 'Gadancha Raja , Rajancha Gad' meaning - 'The king of all Forts and a Fort for King'