ती , अल्लड ,अवखळ ,चंचल सरिता ती, अद्भुत, अनोखी नव परिकथा , ती , सुन्दर,सोज्वळ,गौर रूपगर्विता, ती ,आसमन्ती, अकस्मात झलके विद्युल्लता ती माझी कविता, तीच माझी कविता ॥
विचार करतो तुला सांगाव कसं? माझं मन तुला कळावं कसं? सांगयच तर खुप आहे , पण शब्दात व्यक्त होत नाही, Romantic मला होता येत नाही , आणि सरळ बोलावं असं वाटत नाही, हा विचार तर चालुच राहिल , पण मला तु आवडतेस आणि हा विचार बदलत नाही!