Posts

Showing posts from March, 2013

नमन !

वाटे तुला की, तू एकटा न संगे कोणी , दिवस सरता खायला येई , सुन्न भयाण शांतता न कळे काही , त्रस्त तु सर्वथा मग, कर तू , वाच तू, स्मर तू हे नमन , आहे हे तुजकरिता! मना प्रमाणे सर्व , आनंद वसे अनंता साथ मिळे तुला , जीवन एक कविता सुंदर मोहक दिसे न कुठे कुरुपता असावी ही , पुस्तकातली परिकथा मग, स्फुरे तुला, आवडे तुला, स्मरे तुला, हे नमन , आहे हे तुजकरिता!

कालाय तस्मै नम: !

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगरी जवळच  एक आयटीपार्क नावाचं शहर होतं . शहर मोठ टूमदार .  मोठ्या मोठ्या इमारती, सुंदर चौपदरी  रस्ते. देशाच्या राजानेही या नगरीसाठी  बरयाच सोयी-सुविधा  मोफत  दिल्या होते. करआकारणी सवलतीच्या दारात केली होती. कामगार कायदे  पुरातन असल्याने या नगरीला त्यातून सुट  देण्यात आली .  ह्या नगरीचा विकास होण्यात एकंदर राजाही प्रयत्नशील होता.    एकूणच सगळं  ऐटीत  चालल होतं . शहरातले  लोक सुजाण , सुशिक्षित   आणि कामसू होते.  त्यांच कामही बौद्धिक आणि आवडीचे असे होते. रोज सकाळी शहरातली लोक आपल्या   आपल्या  संस्थेत  जात. प्रत्येक संस्थेत त्यांना चांगली  वागणूक मिळत असे. वातानुकुलीत दालने,  हवा तेंव्हा  आणि पाहिजे  तेंव्हा    चहा- कॉफी , सकाळ - संध्याकाळचा नाष्टा ,दुपारचे जेवण एकदम  वाजवी दारात असा शाही  थाट  होता. कामाचाही फार जास्त दबाव  नसे, सकाळी ९ ते संध्याकाळी ६ कधीतरी ७ , शनिवार , रविवार सुट्टी  असे चालले होते.  कामही संगणकावर असल्याने शारीरिक श्रमाचा प्रश्न नव्हता. दुसरीकडे  नगरीचा विकास जोमाने होत होता . अनेक नवीन गृहप्रकल्प येथे चालू झाले . पूर्वी जी

नाटेकर

नाटेकर , आम्ही सगळे त्यांना नाटेकर म्हणूनच ओळखायचो , त्यांचं नाव माहित   करायच्या भानगडीत बहुधा कोणीच कधी पडलं नाही. मी रत्नागिरीचा मूळचा, तिथे   आजुबाजूला जमीनीवर खटले हे चालुच असतात. नाटेकर ही तिथलेच . रत्नागिरी च्या बाजुलाच केळ्ये गाव आहे , तिथले सर्वात मोठे खातेदार ,म्हणजे सर्वात  जास्त सारा भरणारे, पण तो आहे केवळ कागदावरचा हक्क , प्रत्यक्षात  त्यांच्याकडे एक गुंठाही नाही. लहानपणापासून जेव्हा बघत आलोय तेव्हा  तेव्हा त्यांच्याकडे अनेक पिशव्या दिसत.नंतर कळलं , की यात सर्व  खटल्यांची कागदपत्रं आहेत. स्वत:चे खटले चालवता चालवता ते यात इतके तरबेज  झाले की ते इतरांचेही कज्जे घेऊ लागले. ते स्वतः खटले चालवतात.  पण नाटेकरांची खरी ओळख मला यामुळे नाही झाली , तसंही कोर्टकचेरीतलं  अजुनही विशेष कळत नाही , त्यावेळी तर बिलकुलचं नाही. आमचही गाव केळ्ये ,  तिथे त्रिपूरी पौर्णिमेचा ऊत्सव मोठ्या जोरात साजरा होतो , दिवाळीच्या   दरम्यान जी काकडे आरत चालू होते ती त्रिपूरीला संपते, आणि मग त्यादिवशी  गावजेवण असे. असाच पहिल्या पंक्तीला बसला असताना, नाटेकर समोर बसले होते, आणि जिलबीचं ताट वाढायला आलं , आग्रह