Posts

Showing posts from February, 2018

माझे जगणे होते गाणे ( विडंबन )

माझे जगणे होते गाणे  ( विडंबन ) जाता जाता पिईन मी पिता पिता जाईन मी  गेल्यावरही या मैफिलितल्या  धुंदीमधुनी राहीन  मी ||  माझे  जगणे होते पिणे  कधी मनाचे कधी  जनाचे  कधी पाण्यासवे  कधी सोडयासवे जवळ चणे  फुटाणे ||  सिग्रेटीची संथ धुरावळ  वा मित्रांचा संकर गोंधळ  कायम आर्तता काळजातली  कधीच नाही बहाणे ||  ओकलो अथवा ओकलाो नाही  पोटी काही राहिले नाही  'इंग्लिश' मधील बडबडींचे होई मस्त तराणे ||  आठवणीँचे राजस गुंजन  कधी राजकारणी मंथन  जाणतेपणी अजाणतेचे  सोंग करी शहाणे ||