हरवलेल्या गोष्टी .....शाईचे पेन !
हल्ली बरेचदा असे जाणवते की काही गोष्टी नहीशा होऊ लागल्या आहेत , अर्थात बऱ्याच नव-नवीन गोष्टींची पण काही कमी नाही. पण या नाहीशा होऊ घातलेल्या गोष्टी अथवा विस्मृतीत जाणाऱ्या गोष्टी आठवल्या की मन थोड़सं हळवं होतं आणि आठवणीत रमतं . उदा. शाईचे पेन. स्मार्टफोन / Tab / Laptop च्या जमान्यात कागदावर लिहायला तसं कोणी जातं नाही ,वेळ आलीच तर बॉलपेन असते . पण त्या महिन्या महिन्याला बदलणाऱ्या , कंपनीच्या स्टेशनरितुन उचललेल्या किंवा रिफील न होणाऱ्या पेनात काही आपलेपणा वाटतं नाही ,जो लहानपणी जपलेल्या एखाद्या शाई पेनामध्ये होता. माझी सुरुवात पाटी आणि पेन्सिलीने झाली . बालवाडीत असताना शिसपेन्सिल वापरल्याचे सुद्धा आठवत नाही . तेव्हा एरवी लिहायला आणि भूक लागली तर खायला अशी पांढरी पेन्सिलच वापरली जायची . परीक्षा वगैरे सुद्धा ( जी नावालाच होती ) ती पाटीवरच असायची . पहिलीत गेल्यावर शिसपेन्सिल हातात आल्याचे आठवते . जसे लहानपणाचे दिवस फार काळ आठवणीत टिकत नाहीत त्याप्रमाणे लि...