भिडस्त!
भांडणापासून चार हात लांब,
बोलायच्या आधी मन म्हणतं थांब
विचारांची असते फक्त मनात गस्त
कारण एकच, कारण आम्ही भिडस्त!
कोणाला काही बोललो तर उगाच
आपल्या बोलण्याने होईल उगीच जाच
राहतो गप्प, थोडे त्रस्त थोडे मस्त
कारण एकच, कारण आम्ही भिडस्त!
कधी कोणाला सुखावलं नाही,
कारण कोणाला दुखावलं नाही
सुखाआधीच्या दुःखाची भीती जास्त
कारण एकच, कारण आम्ही भिडस्त!
Comments