शब्दातीत..
काही शब्द कळत नाहीत, कृपया विनोद म्हणून पहावे.
1. जल - हिंदी , जर का जल म्हणजे पाणी , तर जल गया म्हणजे जळणे कसं काय. पाणी तर आग थांबवते.
2. अजिबात - हा मला अजिबात कळत नाही. हा फक्त नकारात्मक का. जर हे विषेशण आहे, तर एखादी गोष्ट अजिबात बरोबर का नसते.
3. धडपड - माणूस धडपड करत असेल तर ते चांगले धरतो...पण एकदा का तो खरंच धडपडला तर मात्र नाही....
4. भयानक, भयंकर - एखादी गोष्ट भयानक अथवा भयंकर चांगली कशी काय होते ?
5. वळण- पुलंना स्मरून, पण सरळ वळणाचे लोक कसे असतात ?
6. मार्क पडतात का , मिळायला हवे ना ?
तुम्हाला काही उदाहरणे माहित असतील तर सांगा...
Comments